
बीड, 13 जुलै (हिं.स.)बीड शहरातील चालू असलेल्या विकास कामात होत असलेला भ्रष्टाचार तसेच कामाची अनियमीतता व कामाचा दर्जा तसेच पाईपलाईन मुळे प्रलंबित असलेले सिमेंट रस्ते या बाबतीत मुख्याधिकारी विक्रम मांडुरकेंनी दोन्ही विरोधी पक्षाच्या वतीने भेट घेत सविस्तर निवेदन त्यांना दिले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नगरसेविका डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत जे ठराव घेतले जातात जे विषय होतात ते सर्व सविस्तर माहितीसहित सर्व नगरसेवक यांना देण्यात यावीत असे यावेळी मागणी केली.यामुळे पारदर्शकता सर्व बाबतीत राहिल असे नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis