यवतमाळमध्ये ‘एसआयआर’च्या नोंदणी प्रक्रियेत कर्तव्यात कसूर, मद्यधुंद बीएलओ आढळला
यवतमाळ, 13 जुलै (हिं.स.) मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान कर्तव्यात गंभीर कसूर करणारा एक बीएलओ मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या अचानक भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. तपासणीत संबंधित बीएलओने
यवतमाळमध्ये ‘एसआयआर’च्या नोंदणी प्रक्रियेत कर्तव्यात कसूर, मद्यधुंद बीएलओ आढळला


यवतमाळ, 13 जुलै (हिं.स.)

मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान कर्तव्यात गंभीर कसूर करणारा एक बीएलओ मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या अचानक भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. तपासणीत संबंधित बीएलओने ११ दिवसांपासून मतदारांची माहिती ऑनलाइन अपलोड न केल्याचेही समोर आले. या बीएलओचे नाव गजानन श्रीराम राठोड (रा. मोहा) असून पुसद कृषी उत्पन्न बाजार समिती कनिष्ठ लिपिक आहे. संबंधित कर्मचार्!याच्या निष्काळजीपणामुळे कामकाजावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. नऊ जुलै रोजी अचानक तपासणी दरम्यान बीएलओची अवस्था संशयास्पद वाटल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने दखल घेत संबंधित बीएलओकडून खुलासा मागविण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेत अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि गैरवर्तन समोर आल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले असून, इतर कर्मचार्!यांनाही कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande