लातूर-पावसाची दडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
लातूर, 13 जुलै (हिं.स.)पावसाळ्याचा सुमारे दीड महिना संपत आला आहे. तरी देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाअभावी आता मूग, उडीद शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला तर जूलैअखेरपर्यंत स
पावसाची प्रतीक्षा


लातूर, 13 जुलै (हिं.स.)पावसाळ्याचा सुमारे दीड महिना संपत आला आहे. तरी देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाअभावी आता मूग, उडीद शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला तर जूलैअखेरपर्यंत सोयाबीन तसेच तुरीची पेरणी होऊ शकते. पण सध्या तरी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्केच पेरण्या झाल्या ओहत. त्यातही गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने या पेरण्यादेखील धोक्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २०२५ हे वर्ष चांगले राहिले. मेपासूनच पावसाळा सुरु झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी जुनमध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली होती. जुलैपर्यंत तर जिल्ह्यात १०० टक्के पेरण्या झाल्या होत्या. पीक ही चांगले आले होते. यंदा मात्र जून कोरडाच गेला. जुलैमध्ये एक-दोन दिवस चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाची भुरभूर राहिली. सातत्याने ढगाळ वातावरण राहत आहे. पाऊस मात्र पडत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande