अमरावती : राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी गुरुदेवभक्तांची वज्रमूठ
अमरावती, 13 जुलै (हिं.स.) | राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी तिवसा येथील शासकीय विश्रामगृहात गुरुदेवभक्तांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळवून द
राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी गुरुदेवभक्तांची वज्रमूठ


अमरावती, 13 जुलै (हिं.स.) | राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी तिवसा येथील शासकीय विश्रामगृहात गुरुदेवभक्तांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच या मागणीच्या पाठपुराव्यासाठी लवकरच 'भारतरत्न समिती' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जगाच्या कल्याणा थोर संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख करत उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक,आध्यात्मिक आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा गौरव केला. देशसेवा, ग्रामविकास, सामाजिक समता आणि जनजागृतीसाठी त्यांनी केलेले कार्य लक्षात घेता त्यांना भारतरत्न देणे ही काळाची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटक प्रल्हादराव पारीसे गुरुजी उपस्थीत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते रवी मानव, नगरसेवक अमर वानखडे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पूनसे, महाराष्ट्र शासन पद्मश्री पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. संजय आदमने, राष्ट्रसंत तुकडोजी सचिव सुनील देशमुख, कथाकार महाराज जन्मस्थळ स्मृती समितीचे शिवदास शृंगारे महाराज, संगीताचार्य गोपाल सालोडकर यांच्यासह अनेक गुरुदेवभक्त उपस्थित होते.

यावेळी जानराव मनोहर, अरुणराव तडस, नामदेवराव ठाकरे, सुरेशराव पवार, शंकरराव मोहोळ, उमेश पारीसे, अमोल बोके, रमेश मुकद्दम, प्रमोद भोंगे आदी मान्यवरांनीही आपली मते मांडली. बैठकीच्या शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न जाहीर होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला, समिती स्थापन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करून राज्यभर जनजागृती, निवेदने केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती गुरुदेवभक्तांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande