वर्ध्यात पावणेतीन लाखांचा दारूसाठा जप्त; दोघांना अटक
वर्धा, 13 जुलै (हिं.स.) सावंगी (मेघे) पोलिसांनी पिपरी मेघे ते उमरी मेघे रोडवर सापळा रचून विनापरवाना गावठी मोहा आणि विदेशी दारूची अवैद्य वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन दुचाकींसह एकूण २ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा म
वर्ध्यात पावणेतीन लाखांचा दारूसाठा जप्त; दोघांना अटक


वर्धा, 13 जुलै (हिं.स.)

सावंगी (मेघे) पोलिसांनी पिपरी मेघे ते उमरी मेघे रोडवर सापळा रचून विनापरवाना गावठी मोहा आणि विदेशी दारूची अवैद्य वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन दुचाकींसह एकूण २ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सावंगी (मेघे) पोलिस ठाण्याचे कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना माहिती मिळाली की दोन व्यक्ती मोटारसायकलने अवैधरित्या दारूची वाहतूक करणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिपरी मेघे ते उमरी मेघे रोडवरील श्याम मोहोड यांच्या ढाब्यासमोर नाकेबंदी केली. नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित दुचाकींना थांबवून त्यांची झडती घेतली. यावेळी दोन वेगवेगळ्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला: अक्षय सिद्धार्थ वैद्य (वय २२, रा. थूल लेआऊट, सिंधी मेघे, वर्धा) याच्या ताब्यातून दुचाकी आणि दारूसाठ्यासह १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सागर ज्ञानेश्वर जयस्वाल (वय २९, रा. गोंडप्लॉट, वर्धा) याच्या ताब्यातून दुचाकी आणि मद्यसाठ्यासह ८२ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण २ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सावंगी पोलिस करत आहेत. ही कारवाई सावंगीचे ठाणेदार विनोद गिरी, अभय खोब्रागडे, श्याम सलामे, गौरव नरताम यांनी केली.

-------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande