
बीड, 13 जुलै (हिं.स.)गुन्हे तपास क्षेत्रात तंत्रज्ञानाचा क्रांतीकारी वापर करत बीड पोलीस दलाने विकसित केलेल्या DeepEye AI या देशातील पहिल्याच End-to-End AI आधारित पोलीस आणि तपास सहाय्य प्रणालीची राज्यस्तरीय तांत्रिक व तपासविषयक Proof of Concept (PoC) पाहणी बीड शहर पोलीस ठाण्यात यशस्वीरित्या पार पडली आहे. या यशस्वी चाचणीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
1. 3 ते 4 तासांची FIR प्रक्रिया आता अवघ्या ३ ते ४ मिनिटांत!
गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची FIR नोंदवण्यासाठी जिथे तासनतास लागायचे, तिथे या AI प्रणालीमुळे अवघ्या ३ ते ४ मिनिटांत FIR चा मसुदा तयार होतो. यामध्ये Live Voice, Audio Upload, e-FIR आणि OCR च्या माध्यमातून माहितीचे विश्लेषण करून BNS, BNSS च्या योग्य कलमांची सूचना AI द्वारे दिली जाते.
2. FIR ते Trial Monitoring - सर्व काही एकाच क्लिकवर!
तक्रार नोंदणीपासून ते थेट न्यायालयातील खटल्याच्या निकालापर्यंत (Trial Monitoring) संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. यात घटनास्थळ पंचनामा मसुदा, वैद्यकीय अहवाल विश्लेषण (Medical Report Analysis) आणि साक्षीदारांच्या जबाबांचे विश्लेषण (Witness Matrix) यांसारख्या सुविधा आहेत.
3. CCTV फुटेज आणि CDR चे AI विश्लेषण
तासनतास लागणारे CCTV फुटेज प्रत्यक्ष पाहण्याची गरज नाही! हे AI स्वतः फुटेज तपासून संशयित व्यक्ती (Face Recognition) आणि वाहने (Vehicle Identification) शोधून काढते. तसेच कॉल डिटेल्स (CDR Analysis) तपासून गुन्हेगारांचे परस्पर संबंध उघड करते.
4. गुन्हेगारांचा 'मोठा डेटाबेस' आणि प्रतिबंधात्मक कारवाई
बीड जिल्ह्यातील 2017 पासूनचे सर्व FIR आणि 800 हून अधिक चार्जशीट या प्रणालीच्या Knowledge Base मध्ये फीड करण्यात आले आहेत. या आधारे सराईत गुन्हेगारांचा पूर्वइतिहास शोधणे, तसेच MPDA आणि MCOCA अंतर्गत करावयाच्या कारवाईसाठी ही प्रणाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित फ्लॅग (सूचना) करते.
Mystic AI Solution चे सीईओ श्री. राजीव सक्सेना (IIT Kanpur माजी विद्यार्थी), C-DAC चे जॉइंट डायरेक्टर श्री. महेश भार्गवा आणि IISER पुणेचे प्रा. प्रणव गोयल यांच्या तज्ज्ञ समितीने 65 PoC टेस्ट केसेसद्वारे या प्रकल्पाचे कठोर मूल्यमापन केले. पुणे पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस उप-महानिरीक्षक श्री. जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मूल्यमापनात समितीने बीड पोलिसांच्या या अभिनव संकल्पनेचे विशेष कौतुक केले.
तपास प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक बनवणारा DeepEye AI प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील इतर पोलीस दलांसाठीही आधुनिक पोलीसिंगचा एक उत्तम आदर्श ठरणार आहे!
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis