
रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार बुधवारी, दि. १५ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
बुधवारी पहाटे ते वंदे भारत एक्स्प्रेसने खेडला येण्यासाठी निघतील. खेडमध्ये ते मंडल अध्यक्ष विनोद चाळके यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर चिपळूणची वाशिष्ठी डेअरी, चिपळूणच्या सहकार भवनातील कार्यकर्ता मेळावा, चिपळूणचे भाजपा कार्यालय, रत्नागिरीचे भाजपा कार्यालय, दुपारी कसबा-संगमेश्वर येथील छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक, चवे-देऊड येथील कातळशिल्पाची पाहणी, रत्नागिरीत जयेश मंगल कार्यालयात जाखडी कलाकार संघटनांचा सत्कार समारंभ, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त २६ व्या कबड्डी दिन कार्यक्रमास उपस्थिती, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत सांगीतिक कार्यक्रमास उपस्थिती असा त्यांचा कार्यक्रम असून त्यानंतर ते रात्री कोकणकन्या एक्स्प्रेस गाडीने मुंबईला रवाना होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी