छ. संभाजीनगर महापालिकेची १४ जुलैला सर्वसाधारण सभा
छत्रपती संभाजीनगर, 13 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिनांक १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आली असून, त्या अनुषंगाने पूर्वतयारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आगामी सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणाऱ्या विव
Q


छत्रपती संभाजीनगर, 13 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिनांक १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आली असून, त्या अनुषंगाने पूर्वतयारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीत आगामी सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणाऱ्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहर विकासाशी निगडित महत्त्वाच्या प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यावर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला तसेच जनहिताच्या दृष्टीने प्रभावी निर्णय घेण्यासाठी आवश्यक नियोजन आणि समन्वय साधण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत आगामी सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक भूमिका मांडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रिय अर्थ मंत्री डॉ. भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, सभागृह नेते प्रा.गोविंद केंद्रे आदि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सदस्य उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande