नांदेडमध्ये अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या
नांदेड, 13 जुलै (हिं.स.)। रविवारी मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पोलिसाला घटनास्थळी सोबत आणले होते आणि त्याच्या समोरच हे निर्घृण हत्याकांड घडले. प्
नांदेडमध्ये अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या


नांदेड, 13 जुलै (हिं.स.)। रविवारी मध्यरात्री नांदेड बस स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने पोलिसाला घटनास्थळी सोबत आणले होते आणि त्याच्या समोरच हे निर्घृण हत्याकांड घडले.

प्राप्त माहितीनुसार, पहाटे २:३० वाजताच्या सुमारास कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले होते. या वादानंतर आरोपी हा बस स्थानकात तैनात असलेल्या नाईट ड्युटी पोलिसाला तक्रार करण्यासाठी किंवा मध्यस्थीसाठी सोबत घेऊन आला. मात्र, आरोपीने रागाच्या भरात पोटात आणि तोंडावर चाकूने अनेक वार केले.या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल् जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.या बाबत तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरवस्तीत एका अल्पवयीन मुलाचा असा निर्घृण खून झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande