तिसऱ्या मजल्यावर बाळंतीणीला उचलून नेण्याची वेळ; बीड जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
बीड, 13 जुलै (हिं.स.)। बीड येथील जिल्हा रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू वार्डात एका बाळंतीण महिलेला नातेवाईकांनी चक्क उचलून नेले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत रुग्णालयातील एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्
झोळीचा वापर


बीड, 13 जुलै (हिं.स.)। बीड येथील जिल्हा रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावरील नवजात शिशू वार्डात एका बाळंतीण महिलेला नातेवाईकांनी चक्क उचलून नेले. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत रुग्णालयातील एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने आता या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे.

बाळंतीण महिलेला किंवा एखाद्या रूग्णाला पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचर आणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र तिथे एकही कर्मचारी आणि स्ट्रेचरही नव्हते. प्रचंड रक्तस्त्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर एका रूग्णाला झोळीत टाकून तिसऱ्या मजल्यावर न्यावे लागले त्याचे व्हिडीओ सुध्दा व्हायरल झालेले आहेत आणि आज पुन्हा एका बाळंतिणीला थेट तिसऱ्या मजल्यावर उचलून नेण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालयात लक्ष घालावे. केवळ सरप्राईज व्हिजीट नको तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande