
बीड, 13 जुलै (हिं.स.)। एससी व एसटी प्रमाणे ओबीसी जनगणना झालीच पाहिजेएससी व एसटी प्रमाणे ओबीसी जनगणना झालीच पाहिजे यासाठी आंदोलनाची रणनिती व दिशा ठरविण्यासाठी सावता परिषदेच्या वतीने आयोजित ओबीसीच्या विविध संघटनाचे प्रमुख मान्यवर व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बीड येथे ओबीसी जनगणना चर्चासत्र पार पडले. या वेळी अतिशय महत्वपूर्ण, उत्साहवर्धक, एकजूट दर्शविणारे तसेच चळवळीला चालना देणारे ठरले, केवळ तनाने नव्हे तर मनाने सर्वजण एकत्रित आल्याचा प्रत्यय आला.
या चर्चासत्रात ओबीसी समूहातील विविध जातींच्या तब्बल ८० समाज संघटनांच्या २८० प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग या चर्चासत्राची व्याप्ती व वैशिष्ट्ये दर्शवीत होता. यापैकी अनेक जणांनी चर्चेत सहभाग नोंदवत उपयुक्त सूचना सुचवून व्यापक व तीव्र आंदोलने छेडण्यासाठी निर्धारपूर्वक मूठी आवळल्या. हा लढा कोणता पक्ष अथवा सरकार यांच्या विरोधात अथवा समर्थनार्थ नसून ओबीसीच्या जिव्हाळ्याचा प्रश्नासाठी असल्याचे स्पष्ट केले. जनजागरण व जनआंदोलन या दोन्ही आघाड्यावर प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी सर्वांनी एकजुटीने साथ देण्याचे आवाहन करून राज्यभर “ओबीसी जनगणना यात्रा” काढण्याचा निर्धार जाहीर केला.
ओबीसी प्रवर्गाच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविणारे प्रा.सुशीलाताई मोराळे, बालाजीराव शिंदे, कल्याणराव दळे, मा.गुफ्रान अन्सारी, प्रा.विष्णू जाधव यांच्या सह आदी अभ्यासपूर्ण व प्रेरक मार्गदर्शनाने चर्चासत्रास वैचारिक उंची लाभली होती. तसेच खासदारांना घेराव घालून निवेदने देणे, स्वाक्षरी अभियान राबवणे, ई-मेल करणे यासोबतच धरणे आंदोलने व मोर्चे काढणे यासाठी एकमत झाले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis