
- धाम प्रकल्प केवळ ५० टक्केच भरला
वर्धा 13 जुलै (हिं.स.)
जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी जिल्ह्यात केवळ ९३.५ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली असून, ही सरासरीच्या अवघी ३४.१ टक्के आहे. या कोरड्या हवामानामुळे जिल्ह्यातील पिकांची वाढ खुंटली असून, पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे.
जलाशयांना दमदार पावसाची प्रतीक्षा वर्धा शहराची जीवनवाहिनी समजला जाणारा ‘धाम प्रकल्प’ या कडक उन्हाळ्यासारख्या वातावरणामुळे अद्याप केवळ ५० टक्क्यांवरच रेंगाळला आहे. जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या जलाशयांनाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास पिकांसोबतच नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी विभागाचा महत्त्वपूर्ण सल्ला या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेत जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उपलब्ध पाण्याचा वापर करून पिकांना केवळ स्प्रिंकलर (तुषार सिंचन) किंवा ठिबक पद्धतीनेच पाणी द्यावे, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत पिकांना रासायनिक खतांचे भारी डोस देणे पूर्णपणे टाळावे, यामुळे पिके जळण्याचा धोका वाढतो. शेतात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या ओळींमध्ये पालापाचोळा किंवा उपलब्ध कचऱ्याचे आच्छादन करावे, शेतातील तण काढून टाकावे जेणेकरून पिकांमधील पाण्यासाठीची स्पर्धा कमी होईल आणि कोळपणी करून जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यास मदत होईल.
जलाशयांना दमदार पावसाची प्रतीक्षा
वर्धा शहराची जीवनवाहिनी समजला जाणारा ‘धाम प्रकल्प’ या कडक उन्हाळ्यासारख्या वातावरणामुळे अद्याप केवळ ५० टक्क्यांवरच रेंगाळला आहे. जिल्ह्यातील इतर लहान-मोठ्या जलाशयांनाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास पिकांसोबतच नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी