रायगडात २२ ते २९ जुलैदरम्यान 'महाराजस्व समाधान शिबिर'
रायगड, 13 जुलै (हिं.स.)। रायगड महसूल विभागातील प्रलंबित प्रश्नांचा जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान'' राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात हे अभि
### **हेडिंग :**  **'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' २२ ते २९ जुलै; महसूल सेवा नागरिकांच्या दारी**  **रायगड :** महसूल विभागातील प्रलंबित प्रश्नांचा जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे **'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान'** राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात हे अभियान **२२ ते २९ जुलै २०२६** या कालावधीत आयोजित करण्यात आले असून नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा त्यांच्या गावाजवळच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  महसूल मंत्री तथा अभियानाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकनेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर हा जयंती सप्ताह उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.  या शिबिरांमध्ये ७/१२ उतारे, विविध दाखल्यांचे वितरण, वारस नोंद, फेरफार, नाव दुरुस्ती, जमिनीचे वर्गबदल, पीक पाहणी, नैसर्गिक आपत्ती पंचनामे, पीक कर्जमाफीसंदर्भातील प्रकरणे, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२, जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रिमिलिअर, विद्यार्थी दाखले, जमीन मोजणी अर्ज, अकृषिक (एनए) मार्गदर्शन तसेच विविध महसुली योजनांची माहिती व लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी, शेतरस्ते, बांधबंदिस्ती, सर्व्हे प्रकरणे आणि नुकसानभरपाईबाबतही विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.  २२ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजनिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करून घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद जाधव यांनी केले आहे.


जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पनवेल येथे दि.15 जुलै रोजगार मेळाव्याचे आयोजन     रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग आणि श्री. डि. डि. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी अँन्ड रिसर्च सेंटर, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बुधवार, दि.15 जुलै 2026 रोजी श्री. डि. डि. विसपुते कॉलेज ऑफ फार्मसी अँन्ड रिसर्च सेंटर, पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी केले आहे.                जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील विविध रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी ,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मसी पदवीधर व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्या कडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे.               रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील कार्यरत महामंडळ रोजगार मेळाव्यामध्ये आपल्या विविध कर्ज योजनासह सहभागी होत आहेत. आपल्याला कर्ज योजनेबद्दल माहिती व मार्गदर्शन याद्वारे दिले जाईल. जेणे करून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. जिल्ह्यात राबविले जाणारे मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहिती व मार्गदर्शन रोजगार मेळाव्यामध्ये केले जाणार आहे. तसेच रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.


रायगड, 13 जुलै (हिं.स.)। रायगड महसूल विभागातील प्रलंबित प्रश्नांचा जलद, पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात हे अभियान २२ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा त्यांच्या गावाजवळच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महसूल मंत्री तथा अभियानाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर हा जयंती सप्ताह उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या शिबिरांमध्ये ७/१२ उतारे, विविध दाखल्यांचे वितरण, वारस नोंद, फेरफार, नाव दुरुस्ती, जमिनीचे वर्गबदल, पीक पाहणी, नैसर्गिक आपत्ती पंचनामे, पीक कर्जमाफीसंदर्भातील प्रकरणे, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२, जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रिमिलिअर, विद्यार्थी दाखले, जमीन मोजणी अर्ज, अकृषिक (एनए) मार्गदर्शन तसेच विविध महसुली योजनांची माहिती व लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी जमीन मोजणी, शेतरस्ते, बांधबंदिस्ती, सर्व्हे प्रकरणे आणि नुकसानभरपाईबाबतही विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

२२ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजनिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडातील नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करून घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande