न्यायालयाच्या वॉरंटवरील सात आरोपी जेरबंद
यवतमाळ, 13 जुलै (हिं.स.)। सुनावणीस वारंवार गैरहजर राहणार्!या आरोपींविरुद्ध मारेगाव पोलिसांनी कठोर भूमिका घेत न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी केली. विशेष मोहिमेअंतर्गत सात आरोपींना ताब्यात घेत न्यायप्रक्रियेला गती देण्याचा
न्यायालयाच्या वॉरंटवरील सात आरोपी जेरबंद


यवतमाळ, 13 जुलै (हिं.स.)।

सुनावणीस वारंवार गैरहजर राहणार्!या आरोपींविरुद्ध मारेगाव पोलिसांनी कठोर भूमिका घेत न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटची प्रभावी अंमलबजावणी केली. विशेष मोहिमेअंतर्गत सात आरोपींना ताब्यात घेत न्यायप्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध गुन्ह्यांतील सुनावणीसाठी न्यायालयाने संबंधित आरोपींना वेळोवेळी समन्स बजावले होते. मात्र, सलग दोनपेक्षा अधिक वेळा न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. न्यायालयाच्या आदेशानंतर मारेगाव पोलिसांनी आठ जुलै रोजी रात्री उशिरा नियोजनबद्ध कारवाई करत आरोपींच्या निवासस्थानी धाड टाकली. या कारवाईत मारेगाव शहरातील पाच तर ग्रामीण भागातील दोन अशा एकूण सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर नऊ जुलै रोजी सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयीन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी, न्यायप्रक्रियेप्रती उत्तरदायित्व आणि कायद्याचा धाक कायम ठेवण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्!यांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळाले आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

-------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande