वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे वाचले वारकऱ्याचे प्राण
बीड, 13 जुलै (हिं.स.)। शिरूर कासार शहरात संत एकनाथ महाराज पालखीचे आगमन होणार असल्यामुळे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य केंद्र, शिरूर कासार यांच्या मार्फत वैद्यकीय पथक सज्ज होते. पालखीतील एका ३८ वर्षीय वारकऱ्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होत असताना
वैद्यकीय पथकाने  वाचवले प्राण


बीड, 13 जुलै (हिं.स.)।

शिरूर कासार शहरात संत एकनाथ महाराज पालखीचे आगमन होणार असल्यामुळे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य केंद्र, शिरूर कासार यांच्या मार्फत वैद्यकीय पथक सज्ज होते. पालखीतील एका ३८ वर्षीय वारकऱ्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होत असताना. उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा मस्के व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णाची तपासणी केली. असता प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच वारकऱ्याला आपत्कालीन सेवा देणाऱ्या अँब्युलन्समधून सुरक्षित उपचार केले. असून वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे वारकऱ्याचे प्राण वाचले.

येथे संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गडाळ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश तांदळे

यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडुन प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरूर कासार यांच्या मार्फत विशेष वैद्यकीय पथक सेवा देण्यासाठी सज्ज होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवित असताना एका ३८ वर्षीय वारकऱ्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होत असताना उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा मस्के व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णाची तपासणी केली. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच डॉ. संग्राम काटे यांच्या मार्फत पुढील उपचारासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या मार्गदर्शनाखाली अँब्युलन्सव्दारे जिल्हा रुग्णालय बीड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात असून वैद्यकीय पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेन उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे एका वारकऱ्याचे प्राण वाचले. या संपूर्ण घटनेची माहिती संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली. यावेळी आरोग्य निरीक्षक लातूरकर विकास रंगनाथ, आरोग्य सहाय्यक बाबुराव जाधव, आरोग्य सेवक संतोष लांडे, निशिकांत खाडे, आरोग्यसेविका कल्पना माने, शिल्पा बनकर, पूजा जोगदंड, समुदाय आरोग्य अधिकारी शैला देशमुख आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande