सोलापूरसह सात जिल्ह्यांसाठी खरीप पीक विमा योजना लागू
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)महाराष्ट्रातील खरीप हंगाम २०२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येणार आहे. ही योजना सोलापूर, अकोला, धुळे, हिंगोली, जळगाव, पुणे आणि सातारा या सात जिल्ह्यांतील क
Pik Veema


सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)महाराष्ट्रातील खरीप हंगाम २०२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येणार आहे. ही योजना सोलापूर, अकोला, धुळे, हिंगोली, जळगाव, पुणे आणि सातारा या सात जिल्ह्यांतील कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी लागू असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, कीड, रोग तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पात्र शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. पीक उत्पादनाचे मूल्यांकन पीक पाहणीच्या आधारे करण्यात येणार असून, नुकसान झाल्यास नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई अदा केली जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संबंधित बँका, महा-ई-सेवा केंद्रे किंवा अधिकृत प्रतिनिधींमार्फत अर्ज करू शकतात. तसेच कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्तींपासून आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande