रत्नागिरीतील उद्यानाला संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्याची मागणी
रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी येथे होणाऱ्या उद्यानाला वारकरी संप्रदायातील थोर संत तेली समाजाचे आराध्य संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

या मागणीबद्दल संत संताजी महाराज जगनाडे सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण वनकर, जिल्ह्याचे तेली समाजाचे ज्येष्ठ नेते बंधू भोपळकर , तेजेश भोपळकर यांनी वर्षा ढेकणे यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी जगनाडे महाराजांच्या कार्याविषयी चर्चा करण्यात आली. तेजेश भोपळकर यांनी संस्थेतर्फे राबवलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. देवरूख येथे नियोजित शनी मंदिर व जगनाडे महाराज मंदिर आणि समाज भवन याबाबतही त्यांनी माहिती दिली.

वर्षा ढेकणे यांनी शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय बाबींबाबत भाजपचा माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली तसेच महिलांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांची माहिती देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

 rajesh pande