संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत दाखल; खंडोबाच्या नगरीत भक्तिमय वातावरण
पुणे, 13 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज खंडोबाची नगरी जेजुरी येथे उत्साहात दाखल झाला. पालखीच्या आगमनाने संपूर्ण जेजुरी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून, ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने नगरी
fgdf


पुणे, 13 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज खंडोबाची नगरी जेजुरी येथे उत्साहात दाखल झाला. पालखीच्या आगमनाने संपूर्ण जेजुरी परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला असून, ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने नगरी दुमदुमून गेली.

पालखीच्या स्वागतासाठी जेजुरी नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि विविध शासकीय यंत्रणांनी व्यापक नियोजन केले होते. पालखी मार्गावर स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. वारकरी आणि भाविकांच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग-भजनांच्या स्वरांत आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत दाखल होताच वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.आषाढी वारीतील हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नियोजित कार्यक्रमानुसार पुढील मुक्कामाकडे प्रस्थान करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande