
यवतमाळ, 14 जुलै (हिं.स.)आषाढी एकादशीनिमित्त परिवहन महामंडळाने ‘लालपरी’चे शेड्यूल तयार केले आहे. जिल्ह्यातील नऊ आगारात मिळून तब्बल २७० ‘लालपरी’ सोडण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड आणि दारव्हा बसस्थानकावर यात्रा शेड उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही जारी केल्या आहेत. पंढरपूर येथील सप्तमी यात्रेची सुरवात सोमवार (ता. २०) पासून होणार आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर येथे जिल्ह्यातील हजारो भाविक जातात. या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता परिवहन महामंडळाने लालपरीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील नऊ आगारातून एसटी बस सोडण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने यवतमाळ ४३, पुसद ३७, वणी २९, उमरखेड ३३, दारव्हा ३१, पांढरकवडा ३०, नेर २०, दिग्रस २६, राळेगाव २१ अशा मिळून २७० एसटी बसचे नियोजन केले आहे.
विशेष म्हणजे नवीन टायर, वायफर, वाहन टूल, दोरी तसेच पावसाळ्यात वाहन गळणार नाही, याची खात्री करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसेसच्या खिडक्या सुस्थितीत तसेच संकटकालीन दरवाजे, प्रवासी मुख्य दरवाजाचे लॉक सुस्थितीत ठेवण्याबाबतही अवगत करण्यात आले आहे. दशमी आणि चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात गर्दी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बसेस मुक्कामी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड आणि दारव्हा बसस्थानकावर यात्रा शेड उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे अवगत केले आहे. नियमित फेर्!यांव्यतिरिक्त या एसटी बसेस वेगळ्या पाठविण्यात येणार आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पंढरपूर येथे जाणार्!या प्रत्येक एसटी बसवर आषाढी पंढरपूर यात्रा, यात्रा स्पेशल, असे फ्लेक्स लावण्यात येणार आहे. ही सेवा २० ते ३० जुलै या कालावधीत देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटी बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मागणीनुसार देणार ‘यात्रा स्पेशल’ बस पंढरपूर जाणार्!या प्रवाशांची संख्या बर्!याच गावातून मोठ्या प्रमाणात राहते. या प्रवाशांना सोयीचे व्हावे, याकरिता महामंडळाने ‘यात्रा स्पेशल’ बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता सोमवार (ता. २०) पूर्वी महामंडळाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे. ही मागणी तालुका तसेच ग्रामपंचायतीतून करता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी