वर्ध्यामध्ये निकृष्ट सोयाबीन बियाण्यांबाबत ३०५ तक्रारी
वर्धा 14 जुलै (हिं.स.)खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून कपाशीच्या तुलनेत जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा करण्यात येतो. तीन महिन्याच्या काळातील या पिकामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. पण, यंदा कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे बाजारात आलेल्या काही कंपनींचे सोयाबीन उगवि
वर्धेत निकृष्ट सोयाबीन बियाण्यांबाबत ३०५ तक्रारी


वर्धा 14 जुलै (हिं.स.)खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून कपाशीच्या तुलनेत जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा करण्यात येतो. तीन महिन्याच्या काळातील या पिकामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. पण, यंदा कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे बाजारात आलेल्या काही कंपनींचे सोयाबीन उगविले नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोयाबीन उगवले नसल्याच्या जिल्ह्यात तब्बल ३०५ शेतकऱ्यांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून होत असलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागात तीन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांकडून दाखल झालेल्या तक्रारीनुसार पाहणी करण्यात येत आहे. या समितीकडून अतापर्यंत एकूण १७० शेतकऱ्यांच्या शेतात तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत त्यांना बियाण्यांत त्रुट्या आढळून आल्याने शेतकऱ्यांना या कंपन्यांनी आर्थिक सहाय्य करावे असा अहवाल देण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून कृषी विभागाकडे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी दिवसागणिक वाढत आहेत. ही स्थिती केवळ वर्ध्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेकजिल्ह्यांमध्ये असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी कृषी आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यात बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी अधिक असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बियाणे विक्रीच्या काळात कृषी विभागाच्या संबंधित यंत्रनेचे याकडे लक्ष नव्हते काय, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तपासणी समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना बियाणे किंवा खरेदी किमतीचा परतावा देण्याच्या सूचना करण्यात आल्या. यात शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा कुठे विचार करण्यात आला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

यंदा ‘त्या’ कंपनीच्या तक्रारी नाही मागील वर्षी ज्या बियाणे कंपन्यांविरोधात तक्रारी झाल्या, त्या कंपन्यांची बियाणे यंदाही बाजारात विकण्यात आली. यंदा त्यांच्या विरोधात तक्रारी नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यंदा नव्या कंपनीच्या बियाण्यांत शेतकऱ्यांना दगा मिळाला आहे. विशेष म्हणजे यात एकाच कंपनीच्या बियाण्यांच्या तक्रारी अधिक आहेत. जालणा येथील एका कंपनीच्या तब्बल १८१ तक्रारी आल्या आहेत. तर इतर कंपनीच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या तक्रारी काही तक्रारी आहे. तक्रार असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी करण्यात येत आहे.

बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी अनेक भागातून कृषी विभागाकडे येत आहेत. त्या तक्रारींची दखल घेत तयार करण्यात आलेल्या तीन समित्यांकडून शेतात जाऊन पाहणी करण्यात येत आहे. तसा अहवाल तयार करून कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत. बियाण्यांच्या बु्स्टर कंपन्यांना जिल्ह्यात विक्रीचा परवाना आहे. ते पेरल्यानंतर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार कारवाई सुरू आहे. - अरविंद उपरीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande