कोल्हापूर महापालिकेच्या क्रीडा समिती सभापती आणि उप-सभापती पदाची निवड
कोल्हापूर, 14 जुलै (हिं.स.)।कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रीडा समिती सभापती आणि उप-सभापती पदाची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरली. दोन्ही पदांसाठी समान मते पडल्याने नियमानुसार ''चिठ्ठी टाकून'' (लॉटरी पद्धतीने) नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आल
कोल्हापूर महापालिका नूतन क्रीडा समिती सभापती आणि उप-सभापती


कोल्हापूर, 14 जुलै (हिं.स.)।कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रीडा समिती सभापती आणि उप-सभापती पदाची निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरली. दोन्ही पदांसाठी समान मते पडल्याने नियमानुसार 'चिठ्ठी टाकून' (लॉटरी पद्धतीने) नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

क्रीडा समिती: नूतन पदाधिकारी

सभापती विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील (भारतीय जनता पार्टी), उप-सभापती रोहित शिवाजीराव कवाळे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रशांत खेडकर आणि विजयसिंह खाडे-पाटील यांना प्रत्येकी ४ समान मते पडल्याने निर्णय चिठ्ठीद्वारे घेण्यात आला. चिठ्ठी काढण्याचे काम महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरातील विद्यार्थिनी कु. रेणूश्री कृष्णात कांबळे हिने केले.

रोहित कवाळे आणि अश्किन आजरेकर यांना समान मते मिळाल्याने पुन्हा चिठ्ठी काढण्यात आली. ही चिठ्ठी विद्यार्थिनी कु. आरोही सूर्यकांत मोहिते हिने काढली, ज्यामध्ये रोहित कवाळे यांची निवड झाली.

अप्पर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. नगरसचिव सुनील बिद्रे, सहा. आयुक्त डॉ. विजय पाटील व परवाना अधीक्षक अशोक यादव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

निवडीनंतर महापौर सौ.रुपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते शारंगधर देशमुख, सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande