यवतमाळमध्ये २९ हजारांवर मजुरांची केवायसी रखडली
यवतमाळ, 14 जुलै (हिं.स.)भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात साडेचार लाख जॉबकार्डधारक मजूर आहे. या मजुरांची केवायसीची प्रक्रिया मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. आजघडीस जिल्ह्यात चार लाख २१ हजार ४१३ मजुरांची केवायसी पूर्ण झाली अ
२९ हजारांवर मजुरांचे केवायसी रखडली


यवतमाळ, 14 जुलै (हिं.स.)भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यात साडेचार लाख जॉबकार्डधारक मजूर आहे. या मजुरांची केवायसीची प्रक्रिया मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. आजघडीस जिल्ह्यात चार लाख २१ हजार ४१३ मजुरांची केवायसी पूर्ण झाली असून, अद्यापपर्यंत २९ हजार ५८६ मजुरांचे केवायसी रखडली आहेत. यात प्रामुख्याने मयत, एकाच कुटुंबातील जॉबकार्डधारकांचा समावेश असल्याची शक्यता आहे. पूर्वीच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना आता नवीन नाव आणि नव्या स्वरूपात आली आहे. या योजनेतील जॉबकार्डधारक प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळेल, अशी ग्वाही शासनाने दिली आहे. तत्पूर्वी संपूर्ण जॉबकार्ड धारक मजुरांची ई केवायसी पूर्ण करावी, असे निर्देश शासनाने फेब्रुवारी महिन्यातच दिले होते.

दरम्यान, केवायसी पूर्ण करण्याकरिता ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. केवायसी झाल्यानंतर थेट मजुरांच्या बँक खात्यात डीबीटीव्दारे मजुरी जमा करण्यास अडचण जाणार नाही, हा मुख्य उद्देश होता. केवायसी ही ग्रामरोजगार सेवकांच्या माध्यमातून करण्यास फेब्रुवारी महिन्यात सुरवात करण्यात आली होती. यवतमाळ जिल्ह्यात एकूण चार लाख ५० हजार ९८६ जॉबकार्डधारक मजुरांची नोंदणी आहे. यातील बहुतांश मजूर एकाच कुटुंबातील आहेत.

फेब्रुवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यातील चार लाख २१ हजार ४१३ मजुरांची केवायसी पूर्ण झाली आहे. तर २९ हजार ५८६ मजुरांची केवायसी विविध कारणाने रखडली आहे. यात प्रामुख्याने मयत मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अनेक मजूर कामानिमित्त इतरत्र स्थलांतरीत झाले आहेत. तर काही मजुरांचे कुटुंब वेगवेगळे झाले आहे. अशा व्यक्तीचे जॉबकार्ड नव्याने तयार करण्यात आले असून, त्या मजुरांची केवायसी पूर्ण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मजुरांची केवायसी रखडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. आता केवायसीची मुदत संपुष्टात आली असून, शिल्लक राहिलेल्या मजुरांना केवायसीकरिता संधी मिळणार की नाही, हे आताच सांगता येणार नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजुरांची केवायसी झालीच नाही. हजारो मजुरांचे जॉबकार्ड चक्क कंत्राटदारांकडे राहत होते. मशीनच्या साहाय्याने कामे करून बोगस ‘मस्टर’ काढण्याचा गोरखधंदा केल्या जात होता. आता मजुरांची केवायसी झाल्यामुळे बोगसपणाला लगाम लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande