यवतमाळ पोलिसांनी २२ हरवलेले मोबाईल शोधून मालकांकडे सुपूर्द केले
यवतमाळ, १४ जुलै (हिं.स.) : जिल्हा पोलिस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील विश्वास व समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या ''ऑपरेशन प्रस्थान'' मोहिमेला यश मिळाले असून, हरवलेले २२ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालक
गहाळ २२ मोबाईल केले नागरिकांना परत


यवतमाळ, १४ जुलै (हिं.स.) : जिल्हा पोलिस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील विश्वास व समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्हा पोलिस दलाने राबविलेल्या 'ऑपरेशन प्रस्थान' मोहिमेला यश मिळाले असून, हरवलेले २२ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांत यवतमाळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी विशेष शोधमोहीम हाती घेतली. तसेच सीईआयआर (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने मोबाईलचा मागोवा घेत एकूण २२ मोबाईल हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २ लाख ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शोधून काढलेले सर्व मोबाईल सोमवारी तक्रारदार नागरिकांना उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी आणि पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर तसेच रवींद्र नेवारे आणि अंकुश फेंडर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande