आयकर विभागाच्या डेटाअभावी शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर
अमरावती, 14 जुलै (हिं.स.) राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ च्या अंमलबजावणीला पुन्हा एकदा विलंब झाल्याने अमरावती जिल्ह्यातील अंजनगावबारीसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडून आय
आयकर विभागाच्या डेटाअभावी शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर


अमरावती, 14 जुलै (हिं.स.) राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ च्या अंमलबजावणीला पुन्हा एकदा विलंब झाल्याने अमरावती जिल्ह्यातील अंजनगावबारीसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकारकडून आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा प्राप्त झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित होणार असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे.

यापूर्वी सरकारने ३० जून व त्यानंतर ५ जुलैपर्यंत कर्जमाफी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. कृषीमंत्र्यांनी ही प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, असे सांगितले होते. मात्र आवश्यक डेटा उपलब्ध न झाल्याने सरकारची आणखी एक डेडलाईन हुकली आहे. याआधी लाडकी बहीण योजनेसाठीही आयकर विभागाचा डेटा मिळण्यास मोठा विलंब झाला होता. या योजनेत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ, मोठ्या थकबाकीदारांसाठी वनटाइम सेटलमेंट आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी संतप्त असून, घोषणा नको, तातडीने कर्जमाफी लागू करा, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande