दर्यापूरच्या सांगळूदकर महाविद्यालयाला वनश्री पुरस्कार घोषित
अमरावती, 14 जुलै (हिं.स.)। श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने अत्यंत प्रतिष्ठेचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश
सांगळूदकर महाविद्यालयाला वनश्री पुरस्कार घोषित


अमरावती, 14 जुलै (हिं.स.)। श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित दर्यापूर येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने अत्यंत प्रतिष्ठेचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयाने अमरावती विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक, तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून दुहेरी बहूमान प्राप्त केला आहे. महाविद्यालयाच्या पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा, सामाजिक बांधीलकीचा आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा गौरव असून, या यशामुळे महाविद्यालयाने विभागीय तसेच राज्यस्तरावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संस्थेच्या भक्कम पाठबळामुळे महाविद्यालयाला पर्यावरण क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविणे शक्य झाले. प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पुरस्कारासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची यशस्वी पूर्तता करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकजुटीने केलेल्या परिश्रमांचे हे यशस्वी फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. हा पुरस्कार प्रस्ताव तयार करण्यात प्रा. डॉ. राहुल सावरकर, प्रा. डॉ. हिमांशू जयस्वाल व प्रा. डॉ. राजेश बुरंगे यांनी विशेष योगदान दिले.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande