यवतमाळ : १०८ रुग्णवाहिकेचा विलंब बेतला जीवावर; नेरमध्ये युवकाचा दुर्दैवी मृत्यू
यवतमाळ, 14 जुलै (हिं.स.) | अपघात झाल्यानंतर जखमींना उपचार मिळावे म्हणून राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत १०८ रुग्णवाहिका जनसेवेत आणल्या. याचा परिणामही चांगला दिसून आला. मात्र, नेर तालुक्यात ही सेवा पूर्णपणे कोलमडली असून सध्या ती नॉट रिचेबल आहे. रवि
अॅम्बुलन्सअभावी युवकाची मृत्यूशी झुंज व्यर्थ


यवतमाळ, 14 जुलै (हिं.स.) | अपघात झाल्यानंतर जखमींना उपचार मिळावे म्हणून राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत १०८ रुग्णवाहिका जनसेवेत आणल्या. याचा परिणामही चांगला दिसून आला. मात्र, नेर तालुक्यात ही सेवा पूर्णपणे कोलमडली असून सध्या ती नॉट रिचेबल आहे. रविवारी सकाळी झालेल्या अपघातात वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख शोएब इलियास असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेख शोएब हा सकाळी सहा वाजता खेड्यावरून कटाईसाठी बकरे आणण्यासाठी त्याच्या स्प्लेंडर दुचाकीने जात होता. दारव्हा रोडवरील कब्रस्तानानजीक एका अवजड वाहनाने याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता यावेळी ट्रक क्रमांक एम. एच. ३४ बी झेड ०८९३ हा या ठिकाणावरून जात असल्याची माहिती पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी १०८ वर तब्बल दहा वेळा संपर्क साधला. परंतु या नंबरवर कोणतेही उत्तर मिळाले नाही व वेळेत रुग्णवाहिका हजर झाली नाही. यानंतर या युवकाला नेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. १०८ ही रुग्णवाहिका ग्रामीण भागातील महिलांच्या प्रसुतीसाठी वापरल्या जाते. या रुग्णवाहिके मध्ये ऑक्सिजन पाईप फाटला होता. अक्षरशः त्या फाटल्या पाईप वर बोट ठेवून कसाबसा ऑक्सिजन सदर युवकाला दिल्या गेला. १०८ या ॲम्बुलन्स वर तज्ञ डॉक्टर व इमर्जन्सी उपचार साहित्य उपलब्ध असते. यावेळी जर १०८ ही रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर कदाचित या युवकाचा प्राण वाचला असता अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande