औसा तालुक्यात स्वतंत्र सहकारी संकुल उभारण्यात यावे – आ. अभिमन्यू पवार
लातूर, 15 जुलै (हिं.स.)। औसा तालुक्यातील सहकार विभागाच्या सर्व कार्यालयांसाठी स्वतंत्र सहकारी संकुल उभारण्यात यावे, या मागणीसंदर्भात आ. अभिमन्यू पवार यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. औसा शहरातील जिल्हा कृषी व ग्
सहकार संकुलाची मागणी


लातूर, 15 जुलै (हिं.स.)। औसा तालुक्यातील सहकार विभागाच्या सर्व कार्यालयांसाठी स्वतंत्र सहकारी संकुल उभारण्यात यावे, या मागणीसंदर्भात आ. अभिमन्यू पवार यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. औसा शहरातील जिल्हा कृषी व ग्रामीण विकास बँकेची (भुविकास बँक) शासनाकडे हस्तांतरित झालेली जागा सहकार विभागाच्या कार्यालयांसाठी उपलब्ध असून, सद्यस्थितीतील इमारत कालबाह्य झाल्यामुळे त्या ठिकाणी आधुनिक व सर्व सुविधायुक्त स्वतंत्र सहकारी संकुल उभारण्याची मागणी यावेळी केली.

मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रधान सचिव, सहकार विभाग यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

हे सहकारी संकुल उभारल्यास सहाय्यक निबंधक, लेखापरीक्षक तसेच इतर सहकार विभागाच्या कार्यालयांचे कामकाज अधिक सक्षम, सुसूत्र आणि लोकाभिमुख होण्यास निश्चितच मोठी मदत होईल, असा विश्वास आ. पवार यांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande