
बीड, 15 जुलै (हिं.स.) : परळी वैजनाथ बस आगार परिसरात पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबवत १५० वृक्षांचे वृक्षारोपण उत्साहात करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ प्रतिनिधिक स्वरूपात परळी नगरीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी आगारप्रमुख, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर भावी पिढीच्या निरोगी, समृद्ध आणि सुरक्षित भविष्याचे आधारस्तंभ आहेत. आज लावलेले हे १५० वृक्ष उद्या परळीच्या हरित विकासाचे साक्षीदार ठरतील, हा विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis