आषाढी वारी : मंदिर परिसरात गॅस, केरोसीन व स्फोटक पदार्थांच्या वाहतूक-साठवणुकीस प्रतिबंध
सोलापूर, 15 जुलै (हिं.स.)। आषाढी वारी २०२६ च्या कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरात गॅस, केरोसीन व स्फोटकजन्य पदार्थांची वाहतूक व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरीक स
आषाढी वारी : मंदिर परिसरात गॅस, केरोसीन व स्फोटक पदार्थांच्या वाहतूक-साठवणुकीस प्रतिबंध


सोलापूर, 15 जुलै (हिं.स.)। आषाढी वारी २०२६ च्या कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरात गॅस, केरोसीन व स्फोटकजन्य पदार्थांची वाहतूक व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.

सहायक पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग यांनी दि. १८.०६.२०२६ पत्रानुसार विनंती केली होती की, आषाढी वारी २०२६ चा यात्रा काळात १७ ते १८ लाख भाविक पंढरपूरला येतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार घाट, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, नामदेव पायरी, मंदिराजवळील व्यापारी, दुकानदार, हॉटेल मालक यांच्याकडून गॅस सिलेंडर, केरोसीनसारख्या ज्वालाग्राही पदार्थांमुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच मानवी जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी १५/०७/२०२६ ते २९/०७/२०२६ या कालावधीत मंदिर परिसरात गॅस, केरोसीन व स्फोटकजन्य पदार्थ यांची वाहतूक व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande