छ. संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाच्या अनुषंगाने बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां
Q


छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी शहरातील नागरिकांना नियमित, सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रखडलेल्या कामांना गती देणे, प्रलंबित अडचणी तातडीने दूर करणे, विभागांमध्ये समन्वय वाढविणे तसेच योजनेची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट व महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

छत्रपती संभाजीनगरकरांना पाण्यासाठी होणारा त्रास कायमस्वरूपी दूर करून प्रत्येक नागरिकापर्यंत शुद्ध व मुबलक पाणी पोहोचावे, यासाठी शासन सकारात्मक असून योजनेची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande