छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सांस्कृतिक जतन आणि सौंदर्यीकरणाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
अ


छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सांस्कृतिक जतन आणि सौंदर्यीकरणाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

सभेत सैनिक कॉलनी ते शेळके शॉप (पहाडसिंगपुरा) मार्गाचे काँक्रीटीकरण व १००० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यास मंजुरी देण्यात आली. शहराची ऐतिहासिक ओळख अधिक प्रभावी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते महात्मा फुले पुतळा व मिल कॉर्नर या मार्गावर आकर्षक दगडी दुभाजक उभारून त्यामध्ये ‘डेट पाम’सह शोभिवंत वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमखास मैदान ते आरेफ कॉलनी मार्गाचे सुशोभीकरण करून भव्य प्रवेशद्वार उभारण्यासही मान्यता देण्यात आली.

शहरातील पथविक्रेत्यांच्या हितासाठी शहरी पथविक्रेता समितीची निवडणूक प्रक्रिया राबविणे, भीमनगर येथे दोन मजली सुसज्ज दवाखाना व महिलांसाठी प्रसूती सुविधा उभारणे, मलेरिया व डास नियंत्रणासाठी विशेष औषध खरेदी, तसेच शाळा, महाविद्यालये व धार्मिक स्थळांजवळील परवानाधारक दारू दुकाने व बिअर बार शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात सिडको एन-६ येथील जुन्या शाळेच्या जागी मराठी व इंग्रजी (CBSE) माध्यमाची अत्याधुनिक शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच स्व.काझी सलीम यांच्या स्मरणार्थ दरवर्षी अधिकृत “मुशायरा व कवी संमेलन” आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली. यासोबतच शहरातील विविध चौक, रस्ते आणि प्रवेशद्वारांना देशभक्त चापेकर बंधू चौक, तुकामाई चौक, धर्मवीर आनंद दिघे चौक, राजे यशवंतराव होळकर चौक, डॉ.जफर अहमद खान मार्ग, शहीद भगतसिंग चौक, महात्मा बसवेश्वर नगर, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन मार्ग, धर्मवीर मोरेश्वरजी सावे मार्ग, छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रवेशद्वार आणि श्री खाटू श्याम बाबा प्रवेशद्वार अशी नावे देण्यासही मंजुरी देण्यात आली.

शहराचा सर्वांगीण विकास, ऐतिहासिक वारशाचे जतन, नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा आणि भविष्यातील आधुनिक छत्रपती संभाजीनगर घडविण्याच्या दिशेने हे सर्व निर्णय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande