अमरावतीत खरीप हंगामासाठी ९७९ कोटींचे पीक कर्ज वाटप
- सहकारी बँकांची आघाडी, खाजगी बँका माघारल्या अमरावती, 15 जुलै (हिं.स.) खरीप हंगाम २०२६-२७ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत सहकारी बँकांनी आघाडी घेतली असून खाजगी बँका कर्ज वाटपामध्ये माघारल्यामुळे हे कर्जवाटप
सहकारी बँकांची आघाडी, खाजगी बँका माघारल्या


- सहकारी बँकांची आघाडी, खाजगी बँका माघारल्या

अमरावती, 15 जुलै (हिं.स.)

खरीप हंगाम २०२६-२७ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत सहकारी बँकांनी आघाडी घेतली असून खाजगी बँका कर्ज वाटपामध्ये माघारल्यामुळे हे कर्जवाटप ६० टक्के ही पूर्ण होऊ शकले नाही. ३० जून २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी ६६ हजार ७८२ शेतकऱ्यांना तब्बल ९७९ कोटी १७लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टाच्या ५९ टक्के पूर्तता झालेली आहे.

अमरावती जिल्ह्यासाठी खरीप हगामात १ लाख ८८ हजार ६०० खातेदारांना १ हजार ६५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जून अखेरपर्यंत ६६ हजार ७८२ खातेदारांच्या माध्यमातून ९७९ कोटी १७ लाख रुपयांचे कर्ज वितरण पूर्ण झाले आहे. पीक कर्ज वाटपात सहकारी बँकांनी आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेमिळून ४४ हजार २८५ शेतकऱ्यांना ६३५ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले असून, उद्दिष्टाच्या तुलनेत ८२ टक्के प्रगती साधली आहे. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांनी २१ हजार ९६० शेतकऱ्यांना ३३५ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. या गटाची कर्ज वाटपातील प्रगती ४० टक्के आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २० हजार ९५४ शेतकऱ्यांना ३२८ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे.खासगी बँकांकडून मात्र कर्ज वाटपाचा वेग तुलनेने कमी राहिला असून, १ हजार ६ खातेदारांना ७ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ५३७ शेतकऱ्यांना. ७ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande