भारताच्या प्रगतीसाठी संशोधनावर लक्ष - पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील
पुणे, 15 जुलै (हिं.स.)। भारताच्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीसाठी नवोपक्रम व संशोधनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आगामी काळात पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) हे स्टार्टअप केंद्रित विद्यापीठ म्हणून विकसित करण्यात येईल. तसेच हरित ऊर्जा, हवामान बदल, शाश
harshwardhan  patil


पुणे, 15 जुलै (हिं.स.)।

भारताच्या औद्योगिक, आर्थिक प्रगतीसाठी नवोपक्रम व संशोधनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आगामी काळात पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) हे स्टार्टअप केंद्रित विद्यापीठ म्हणून विकसित करण्यात येईल. तसेच हरित ऊर्जा, हवामान बदल, शाश्वत शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक सहकार्य या क्षेत्रात संशोधन करून आव्हानांचे संधी मध्ये रूपांतर करून स्टार्टअपला चालना दिली जाईल. तसेच भारत - जपान सहकार्य माध्यमातून विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) येथे 'आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड मीट (आयएम ३)–२०२६' च्या उद्घाटन प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. विकसित भारत २०४७ या संकल्पनेला संशोधन आणि नव उपक्रम या माध्यमातून गती देण्यासाठी आयोजित परिषदेत कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, संशोधन व विकास संचालक तसेच डॉ. भरत काळे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, मायक्रोलिन (अमेरिका) चे संस्थापक डॉ. अशोक जोशी आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल, ऑस्ट्रेलिया येथील ग्लोबल इनोव्हेटिव्ह सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड नॅनोमटेरियल्सचे संचालक प्रा. अजयन विनू , मिड स्वीडन विद्यापीठाचे डॉ. कौस्तुभ दलाल, सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. विजय मोहनन पिल्लई, भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील प्रा. पी. एस. अनिल कुमार, टाटा केमिकल्सचे ग्लोबल हेड इनोव्हेशन डॉ. रिचर्ड लोबो, सी-डॅकचे डॉ. कृष्णांजन भट्टाचार्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. विलास खरचे, दक्षिण आफ्रिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ व्हेंडा येथील डॉ. फुलुफ्हेलो नेमांगवेले, भारतीय विज्ञान संस्थेचे डॉ. सचिन रोंडिया आदींसह देश विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी ॲबस्ट्रॅक्ट स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी विद्यापीठातील संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सक्षम परिसंस्थेची माहिती देत विद्यार्थी आणि संशोधकांनी समाजोपयोगी संशोधन करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande