जळगाव जिल्ह्यातील आठ तलाव मासेमारी ठेक्यासाठी  ई-निविदा प्रक्रिया
जळगाव, 15 जुलै (हिं.स.) जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या आणि मासेमारी ठेक्याची मुदत दि. ३० जून २०२६ रोजी संपुष्टात येणाऱ्या आठ तलाव व जलाशयांचा पुढील पाच वर्षांसाठी नव्याने मासेमारी ठेका देण्
जळगाव जिल्ह्यातील आठ तलाव मासेमारी ठेक्यासाठी  ई-निविदा प्रक्रिया


जळगाव, 15 जुलै (हिं.स.) जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या आणि मासेमारी ठेक्याची मुदत दि. ३० जून २०२६ रोजी संपुष्टात येणाऱ्या आठ तलाव व जलाशयांचा पुढील पाच वर्षांसाठी नव्याने मासेमारी ठेका देण्याचे प्रस्तावित आहे. शासन निर्णय दि. ३ जुलै २०१९ मधील अटी व शर्तीच्या अधीन राहून सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ई-निविदा प्रक्रियेद्वारे हे तलाव मासेमारी ठेक्याने देण्यात येणार आहेत. यामध्ये को. प. बंधारा (४४.९७ हे.), शहापूर (४७.०० हे.), खडकेसिम (३०.०० हे.), लोणीसिम (३५.३६ हे.), शेळावे (२७.०० हे.), दहीगाव बंधारा (२३९ हे.), शिरसमणी (७३.०० हे.) आणि आर्डी (३१.०० हे.) या आठ तलावांचा समावेश आहे. ई-निविदा प्रक्रियेबाबतचा सविस्तर तपशीलhttp://mahatenders.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध असुन इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था/मत्स्यव्यवसाय सहकारी संघ/मच्छीमार/मत्स्य-संवर्धक/खाजगी उद्योजक / खाजगी व्यक्ती यांनी सदर तलाव मासेमारी ठेक्याने मिळणेसाठी ई निविदा सादर करावी असे आवाहन अ.रा. पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय , जळगाव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande