परभणी - गोसंवर्धन दिनानिमित्त सर्व कत्तलखाने व मांसाहारी मद्यपान दुकाने बंद ठेवण्याची मागणी
परभणी, 15 जुलै, (हिं.स.)। 22 जुलै रोजी शुध्द देशी गोवंश जतन आणि गोसंवर्धन दिन सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शाळा व महाविद्यालयात साजरा करावा व त्या दिवशी सर्व कत्तलखाने, मांसाहारी व मद्यपान दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी येथील गोरक्षक सेनेने
परभणी - गोसंवर्धन दिनानिमित्त सर्व कत्तलखाने व मांसाहारी मद्यपान दुकाने बंद ठेवण्याची मागणी


परभणी, 15 जुलै, (हिं.स.)। 22 जुलै रोजी शुध्द देशी गोवंश जतन आणि गोसंवर्धन दिन सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शाळा व महाविद्यालयात साजरा करावा व त्या दिवशी सर्व कत्तलखाने, मांसाहारी व मद्यपान दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी येथील गोरक्षक सेनेने तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

गोरक्षक सेनेचे मराठवाडा अध्यक्ष नितीन जाधव व उपाध्यक्ष योगगुरु चंपालाल ठाकूर, गोभक्त भागवत पहेलवान बोबडे व अन्य सदस्यांनी स्थानिक तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून या शुध्द देशी गोवंश जतन गोसंवर्धन दिनानिमित्त सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधून गोमातेचे पुजन किंवा प्रतिमेचे पुजन करावे, त्या दिवशी कत्तलखाने, मांसाहारी दुकाने बंद ठेवावीत, तसेच गोमाता, नंदीबैल पशूंसाठी शिबीरे व चर्चासत्रे राबविण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande