बीड सांगवी येथे आयोजित महादेव दरा दिंडी सोहळ्यास आ. सुरेश धस यांची उपस्थिती
बीड, 15 जुलै, (हिं.स.)। श्री क्षेत्र महादेव मंदिर, महादेव दरा संस्थान, बीड सांगवी,(ता. आष्टी)येथील सोहळ्यास आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती. या वेळी सुरेश धस म्हणाले की, ह.भ.प. महंत कल्याण महाराज कोल्हे यांच्या समवेत श्री क्षेत्र महादेव मंदिर, म
बीड सांगवी येथे आयोजित महादेव दरा दिंडी सोहळ्यास आ. सुरेश धस यांची उपस्थिती


बीड, 15 जुलै, (हिं.स.)। श्री क्षेत्र महादेव मंदिर, महादेव दरा संस्थान, बीड सांगवी,(ता. आष्टी)येथील सोहळ्यास आमदार सुरेश धस यांची उपस्थिती होती. या वेळी सुरेश धस म्हणाले की, ह.भ.प. महंत कल्याण महाराज कोल्हे यांच्या समवेत श्री क्षेत्र महादेव मंदिर, महादेव दरा संस्थान, बीड सांगवी येथे आयोजित श्री क्षेत्र महादेव दरा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थित वारकरी, भक्त-भाविकांशी आत्मियतेने संवाद साधत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महादेवाच्या पिंडीचे यथासांग पूजन आणि अभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले. ह.भ.प. महंत कल्याण महाराज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पायी दिंडीत भाविकांनी उस्फूर्त सहभाग घेतला आहे. सर्व वारकऱ्यांची पंढरपूरची वारी सुखरूप, निर्विघ्न व यशस्वी होवो, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande