महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांना पितृशोक; गुलाम नबी काझी यांचे निधन
बीड, 15 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आणि महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शफी काझी यांचे वडील गुलाम नबी कासमशा काझी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छत्रपती संभाजीनगर येथील आयकॉन रुग्णालयात
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांना पितृशोक; गुलाम नबी काझी यांचे निधन


बीड, 15 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आणि महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शफी काझी यांचे वडील गुलाम नबी कासमशा काझी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. छत्रपती संभाजीनगर येथील आयकॉन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एका अत्यंत साध्या, धार्मिक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने काझी कुटुंबावर मोठा आघात झाला असून बीड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, फारुक, शफी, समीर आणि जावेद ही चार मुले, तीन मुली, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील रहिवासी असलेले गुलाम नबी काझी हे व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये सहकुटुंब स्थायिक झाले होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या गुलाम नबी यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande