
बीड, 15 जुलै (हिं.स.)।
ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित तालुका क्रीडा संकुलांच्या उभारणीच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला.
बैठकीत परळी, शिरूर, आष्टी, पाटोदा, धारूर आणि वडवणी येथील क्रीडा संकुलांसाठी आवश्यक जागेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पाटोदा, आष्टी आणि शिरूर येथे पर्यायी गायरान जमिनीचा शोध घेऊन १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
धारूर आणि वडवणी येथील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
परळी तालुका क्रीडा संकुलासाठी महानिर्मितीच्या ताब्यातील जमीन उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडूंना आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis