लातूर - मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांची पालिका शाळांना अचानक भेट
लातूर, 15 जुलै (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी उपायुक्त वसुधा फड यांच्यासह मनपा शाळा क्रमांक २३ (सुभेदार
मन आयुक्त राहुल कुलकर्णी यांची शाळेला भेट


लातूर, 15 जुलै (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी उपायुक्त वसुधा फड यांच्यासह मनपा शाळा क्रमांक २३ (सुभेदार रामजी नगर) आणि मनपा शाळा क्रमांक २८ (इंडिया नगर) येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आयुक्तांनी वर्गखोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांनी अधिक कल्पक आणि प्रभावी अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पाहणीदरम्यान वर्गातील बैठक व्यवस्था, प्रकाश व वायुवीजन, स्वच्छतागृहांची स्वच्छता, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेची इमारत, क्रीडांगण तसेच परिसरातील सुरक्षितता व देखभाल यांचीही तपासणी करण्यात आली.

शाळांमधील आवश्यक दुरुस्त्या आणि भौतिक सुविधांतील कमतरता तातडीने दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. महानगरपालिकेच्या शाळांमधील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

आयुक्तांच्या या आकस्मिक भेटीमुळे शिक्षण विभागातील कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार असून, शिक्षकांमध्येही जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होणार असल्याचे सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande