अलिबाग नगरपरिषदेत ‘नमस्ते डे’ उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
रायगड, १५ जुलै (हिं.स.) : भारत सरकारच्या नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम (नमस्ते) उपक्रमांतर्गत अलिबाग नगरपरिषदेतर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांसह
Namaste-Day-in-Alibaug-Sani


रायगड, १५ जुलै (हिं.स.) : भारत सरकारच्या नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम (नमस्ते) उपक्रमांतर्गत अलिबाग नगरपरिषदेतर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांसह स्वच्छता अभियानात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात उपनगराध्यक्ष ऍड. मानसी म्हात्रे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यपरिसर उपलब्ध करून देणे हीच ‘नमस्ते डे’ची खरी भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा अक्षया नाईक, नगरसेविका संध्या पालवणकर, ॲड. नीलम हजारे, नगरसेवक ॲड. ऋषिकेश माळी, जमालुद्दीन सय्यद, संदीप पालकर, प्रशासकीय अधिकारी प्रियांका वाघ, नगर अभियंता संतोष मुंढे, स्वच्छता अभियंता प्रियांका मोरे, स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, शहर समन्वयक आर्या जाधव, प्रकाश तांबे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि यांत्रिक स्वच्छता व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीचा संदेश देण्यात आला.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande