नांदेड येथे सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक
नांदेड, 15 जुलै, (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक समन्वयातून आणि एकमताने पार पडावी, या उद्देशाने नांदेड येथे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सहकार चळव
अ


नांदेड, 15 जुलै, (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक समन्वयातून आणि एकमताने पार पडावी, या उद्देशाने नांदेड येथे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी सहकार चळवळीची परंपरा अधिक बळकट करताना संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी परस्पर संवाद, विश्वास आणि एकमताला प्राधान्य देण्याबाबत विचारविनिमय झाला.

यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, माधवराव जवळगावकर, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, मारोतराव कवळे गुरुजी, मीनलताई पाटील खतगावकर, उमरीचे उपनगराध्यक्ष कैलास गोरठेकर, गंगाधरराव राठोड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande