रायगडमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजासाठी स्वयंरोजगार योजनांचे ऑनलाइन अर्ज सुरू
अलिबाग, १५ जुलै (हिं.स.) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून विविध स्वयंरोजगार योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Online-applications-have-start

अलिबाग, १५ जुलै (हिं.स.) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रायगड यांच्या वतीने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून विविध स्वयंरोजगार योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळामार्फत अर्ज केवळ महादिशा पोर्टल किंवा महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच स्वीकारले जाणार असून, जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक एन. साळवी यांनी दिली.

भारत शासनाच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या अंतर्गत ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून, लघुउद्योग, सूक्ष्म व्यवसाय आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अनुदान व सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी महादिशा पोर्टल किंवा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन. साळवी यांनी केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande