
नांदेड, 15 जुलै (हिं.स.) : भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, जल संस्कृतीचे जनक, मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त श्री शारदा भवन एयशवंत महाविद्यालय, नांदेड तर्फे शेती, सिंचन व मराठी साहित्य या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद 2026 चे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून भोकर विधान सभेच्या लोकप्रियज्यूकेशन सोसायटी, नांदेड अंतर्गत आमदार Adv.कु.श्रीजया चव्हाण होत्या तर बीजभाषक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ.सुधीरजी गव्हाणे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजित भालेराव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.मा.मा.जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय जगताप, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.शिवाजी सूर्यवंशी संस्थेचे प्राध्यापक शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपास्थित होते. यावेळी जर्नल, येशोदीप, विज्ञानाचा रोमांचक इतिहास या पुस्तकांचे प्रकाशन देखील झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis