अमृत स्थानक लोकार्पण सोहळ्यास शंकर बाबा पापळकर यांना विशेष निमंत्रण
अमरावती, १५ जुलै (हिं.स.) : निराधार, बेवारस, मतिमंद आणि दिव्यांग बालकांसाठी आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री समाजसेवक डॉ. शंकर बाबा पापळकर यांच्या कार्याचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाला आहे. भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत
अमृत स्थानक लोकार्पण सोहळ्यास पद्मश्री डॉ. शंकर बाबा पापळकर यांना विशेष निमंत्रण समाजसेवेच्या तपस्येला भारतीय रेल्वेकडून सन्मान


अमरावती, १५ जुलै (हिं.स.) : निराधार, बेवारस, मतिमंद आणि दिव्यांग बालकांसाठी आयुष्य समर्पित करणारे पद्मश्री समाजसेवक डॉ. शंकर बाबा पापळकर यांच्या कार्याचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाला आहे. भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘अमृत स्थानक’ लोकार्पण सोहळ्यास त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले असून, हा क्षण संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरातील २६१ रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक सुविधांसह विकास करण्यात आला आहे. या अमृत स्थानकांमध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. १७ जुलै २०२६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या स्थानकांचे राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. बी. तपस्वी (IRTS) यांच्या वतीने पद्मश्री डॉ. शंकर बाबा पापळकर यांना विशेष निमंत्रण पाठविण्यात आले. हे निमंत्रण १५ जुलै २०२६ रोजी बडनेरा रेल्वे स्थानकाचे प्रमुख वाणिज्य निरीक्षक प्रमोद लोणारे यांनी वझ्झर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य बेवारस मतिमंद अपंग बालगृहात प्रत्यक्ष भेट देऊन सन्मानपूर्वक प्रदान केले.

यावेळी प्रमोद लोणारे यांनी नांदुरा अमृत स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याची माहिती देत, समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. पापळकर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला अधिक अर्थपूर्ण ठरेल, असे सांगत त्यांना उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले.

पद्मश्री डॉ. शंकर बाबा पापळकर यांनी आयुष्यभर उपेक्षित, निराधार आणि बेवारस बालकांना मायेची ऊब, शिक्षण, संस्कार आणि जगण्याचा आधार दिला आहे. त्यांच्या निःस्वार्थ समाजकार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले असून, त्यांचे कार्य देशभरासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

भारतीय रेल्वेसारख्या राष्ट्रीय संस्थेने त्यांना या ऐतिहासिक सोहळ्यास विशेष निमंत्रित करून त्यांच्या समाजसेवेचा सन्मान केला आहे. १७ जुलै २०२६ रोजी नांदुरा रेल्वे स्थानकावर होणाऱ्या अमृत स्थानक लोकार्पण सोहळ्यात डॉ. शंकर बाबा पापळकर विशेष उपस्थित राहणार असून, विकसित भारताच्या दिशेने भारतीय रेल्वेने टाकलेल्या महत्त्वपूर्ण पावलाचे ते साक्षीदार ठरणार आहेत.

समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि विकासाचा संगम घडविणारा हा सोहळा विदर्भासाठी अभिमानाचा क्षण ठरणार असून, माणुसकीच्या कार्यालाही राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळत असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande