नागावमध्ये पर्यटन व्यवसायिकांना कायदेशीर नियमांचे मार्गदर्शन; पर्यटकांच्या सुरक्षिततेवर भर
अलिबाग, 15 जुलै(हिं.स.) : नागावमधील पर्यटन अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत राहावे या उद्देशाने नागाव ग्रामपंचायत आणि अलिबाग पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यवसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. सरप
**मथळा :**  ### **नागाव पर्यटनाला सुरक्षिततेचे कवच; महिनाभरात पोलीस चौकी**  **अलिबाग, दि. १५ :** नागावमधील पर्यटन अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत राहावे या उद्देशाने नागाव ग्रामपंचायत आणि अलिबाग पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यवसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत पर्यटन व्यवसायाशी संबंधित नियम, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि कायदेशीर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  बैठकीच्या प्रारंभी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडे यांनी हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्स आणि समुद्रकिनारी पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक परवानग्या, पर्यटकांची नोंदवही ठेवण्याची पद्धत, शासनाच्या नव्या नियमावली तसेच व्यवसायिकांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले.  बैठकीत पर्यटन व्यवसायिकांनी विविध समस्या, अडचणी आणि शंका मांडल्या. त्यावर पोलीस प्रशासनाने समाधानकारक उत्तरे देत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नागावमध्ये येत्या महिनाभरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांनी दिली.  बैठकीस सरपंच हर्षदा मयेकर, उपसरपंच मंगल नागे, जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, सर्कल अधिकारी तसेच पर्यटन व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोपावेळी सरपंच हर्षदा मयेकर यांनी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून नागावला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आदर्श पर्यटनस्थळ बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


अलिबाग, 15 जुलै(हिं.स.) : नागावमधील पर्यटन अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत राहावे या उद्देशाने नागाव ग्रामपंचायत आणि अलिबाग पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यवसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. सरपंच हर्षदा मयेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीत पर्यटन व्यवसायाशी संबंधित नियम, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि कायदेशीर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडे यांनी हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्स तसेच समुद्रकिनारी पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक परवानग्या, पर्यटकांची नोंदवही ठेवण्याची पद्धत, शासनाच्या नव्या नियमावली आणि व्यवसायिकांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर माहिती दिली.

बैठकीत पर्यटन व्यवसायिकांनी विविध समस्या, अडचणी आणि शंका उपस्थित केल्या. त्यावर पोलीस प्रशासनाने समाधानकारक उत्तरे देत आवश्यक सूचना केल्या. यावेळी नागावमध्ये येत्या महिनाभरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी दिली.

या बैठकीस सरपंच हर्षदा मयेकर, उपसरपंच मंगल नागे, जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, सर्कल अधिकारी तसेच पर्यटन व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारोपावेळी सरपंच हर्षदा मयेकर यांनी ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून नागावला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आदर्श पर्यटनस्थळ बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

----------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande