
अमरावती, 15 जुलै (हिं.स.) | गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना भाग 1 मधून पूर्णतः कोरडवाहू भाग वगळला होता. वर्हा, मालधुर, धोत्रा माळेगाव सालोरा शेंदोळा बु शिवणगाव व इतर भागातील शेतीला पाणी मिळालेच नाही. सादर गावांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी आमदार बच्चू कडू हे राज्यमंत्री असतांना प्रहारचे संजय देशमुख,वर्हा येथील भूमिहीन मुरली मदणकर, व रवी पाथरे हे आमरण उपोषणाला बसले होते या उपोषणाची दखल घेत बच्चू कडू यांनी सदर कोरडवाहू गावातील शेतीला पाणी देण्यासंदर्भात योजना तयार करण्याचे आदेश संबंधित कार्यकारी अभियंता यांना दिले.
योजना निर्माण करण्यासाठी सर्व बाबींना तपासून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु झाले. त्या नंतर सदर गावे नदीजोड योजनेत घेण्यात येईल असे विभागाने ठरविले. नदीजोड प्रकल्प होईल कधी आणि शेतकऱ्यांना पाणी मिळेल कधी ही बाब शासन स्तरावर प्रहार च्या संजय देशमुख यांनी सांगितले आणि सदर कोरडावाहू गावांसाठी स्वतंत्र्य उपसा जलसिंचन योजनाच मंजूर करावी हा आग्रह धरला त्या साठी आवश्यक पत्र व्यवहार देखील केला. या साठी तिवसा मतदार संघांचे आमदार राजेश वानखडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र देऊन सदर उपसा योजना मंजूर करण्या साठी प्रयत्न करावे अशी विनंती केली तसेच विधानपरिषदेचे आमदार यांना देखील सदर योजनेच्या मंजूरसंदर्भात प्रयत्न करावे ही विनंती केली. त्या अनुषंगाने आमदार राजेश वानखडे आणि आमदार बच्चू कडू यांनी लेखी तसेच सभागृहात शासनाकडे मागणी केली. त्या मुळेच सदर योजनेला मंजुरात मिळाली.
सदर योजने मुळे या कोरडवाहू परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. काही वृद्ध शेतकऱ्यांच म्हणणे असे की आम्हाच्या हयातीत जरी शेतीला पाणी मिळालं नाही पण आमच्या मुलांचे आयुष्य तरी सुधारेल. या प्रकल्प मंजूर झाल्या बद्दर सिंचन विभागाचे अभियंता राजभोज यांचे आभार शेतकऱ्यांनी मानले. या वेळेस भीमरावजी गवळी, सुरेंद्र धस्कट, नारायनराव उमक यांच्या सह आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी