उद्यापासून राजापेठ-अंबादेवी मंदिर रस्ता वाहतुकीसाठी बंद; सौंदर्यीकरण आणि प्रवेशद्वाराच्या बांधकामामुळे प्रशासनाचा निर्णय
अमरावती, 15 जुलै (हिं.स.) शहरातील राजापेठ परिसरातील अंबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था उद्या 16 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागातील ''एच अँड एफ'' (H&F) शोरूमसमोर भव्य प्रवेशद्वार
उद्यापासून राजापेठ-अंबादेवी मंदिर रस्ता वाहतुकीसाठी बंद; सौंदर्यीकरण आणि प्रवेशद्वाराच्या बांधकामामुळे प्रशासनाचा निर्णय


अमरावती, 15 जुलै (हिं.स.)

शहरातील राजापेठ परिसरातील अंबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था उद्या 16 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागातील 'एच अँड एफ' (H&F) शोरूमसमोर भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील टप्प्यातील सौंदर्यीकरणाचे काम सुरू असताना कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होऊ नये, या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

या कालावधीत अंबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी व नागरिकांसाठी दोन मुख्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार, नवाथे नगरकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनधारकांनी 'कुशल ऑटो'कडून भूतेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. तसेच, कंवर नगर परिसराकडून येणाऱ्या नागरिकांनी 'मोनालिसा कॉम्प्लेक्स' जवळील रस्त्याचा वापर करावा. या पर्यायी मार्गांमुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. हा वाहतूक बदल 3 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत वाहनचालक, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने घातलेल्या नियमांचे व निबंधांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम वेळेत व सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी सर्व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता विनोद बोरसे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande