फळ पिक विमा योजना : मृगबहार 2026 बहार मध्ये विक्रमी नोंदणी
छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)। पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना अंतर्गत मृगबहार 2026 साठी विमा नोंदणी 27 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू झाली. गतवर्षी मृगबहार 2025 मध्ये या योजनेमधील एकूण विमा अर्ज संख्या 52 हजार 121 होती.
फळ पिक विमा योजना : मृगबहार 2026 बहार मध्ये विक्रमी नोंदणी


छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै (हिं.स.)। पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना अंतर्गत मृगबहार 2026 साठी विमा नोंदणी 27 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू झाली. गतवर्षी मृगबहार 2025 मध्ये या योजनेमधील एकूण विमा अर्ज संख्या 52 हजार 121 होती.

चालू वर्षी मृगबहार मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू ,सीताफळ ,मोसंबी ,संत्रा, डाळिंब, चिकू या पारंपारिक पिकांबरोबर अंजीर व हळद या नवीन पिकांचा समावेश पहिल्यांदा करण्यात आला. या पिकांसाठी असलेली प्रती हेक्टर विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे . द्राक्ष विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 3 लाख 80 हजार रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 19 हजार रुपये प्रति हेक्टर, पेरु विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 70 हजार रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 3 हजार 500 रुपये प्रति हेक्टर, लिंबू विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 80 हजार शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 4 हजार रुपये प्रति हेक्टर, सीताफळ विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 70 हजार शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 3 हजार 500रुपये प्रति हेक्टर,मोसंबी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 5 हजार रुपये प्रति हेक्टर, संत्रा विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 5 हजार रुपये प्रति हेक्टर, डाळिंब विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 60 हजार रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 8 हजार रुपये प्रति हेक्टर, चिकू विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 70 हजार रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 3 हजार 500 रुपये प्रति हेक्टर,अंजीर विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 60 हजार रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 8 हजार रुपये प्रति हेक्टर, हळद विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 80 हजार रुपये शेतकऱ्याने भरावयाचा साधारण 5 टक्के नुसार विमा हप्ता 9 हजार रुपये प्रति हेक्टर,

या योजनेत अंजीर व सीताफळ या पिकासाठी विमा योजनेत सहभागाचा अंतिम दिनांक 31 जुलै आहे. तर उर्वरित सर्व पिकांसाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक 14 जुलै 2026 पर्यंत होता. यामध्ये 14 जुलै 2026 पर्यंत 81 हजार 523 विमा अर्जांची नोंदणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत 29 हजार 402 विमा अर्ज वाढले असून ते गतवर्षीच्या तुलनेत 156 टक्के आहेत.

यात प्रामुख्याने हळद पिकासाठी सर्वाधिक 41 हजार 595 विमा अर्ज असून त्या खालोखाल संत्रा – 10 हजार 237, डाळिंब – 8 हजार 63 अर्ज आहेत. जिल्हा निहाय सहभाग पाहिला असता सर्वाधिक सहभाग नांदेड – 13 हजार 875 असून त्या खालोखाल परभणी-12 हजार 162 हिंगोली-11 हजार 910 व अहिल्यानगर-11 हजार 35 असा आहे.हळद पिकासाठी लागू केलेल्या विमा योजनेस परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. अंजीर व सीताफळ या पिकासाठी अद्याप 31 जुलै पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याचबरोबर बँके मार्फत सादर होणाऱ्या अर्जांमुळे या संख्येत वाढ होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी या फळपीक विमा योजनेस अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. योजनेतील सर्व सहभाग हा NCIP या online पोर्टल च्या माध्यमातून होतो. योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकरी यांनी digitalcropsurvey न चुकता करावा , जेणेकरून त्यांचा विमा अर्ज अपात्र होणार नाही . अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा अभ्यास करून विमा योजनेत सहभाग घेणेबाबत निर्णय घ्यावा .

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande