
बीड, 15 जुलै, (हिं.स.)। श्री क्षेत्र मुक्ताईनगर, (जि.जळगाव) येथून ८०० वर्षापासूनची परंपरा असलेली दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या श्री संत मुक्ताबाई पालखी दिंडी सोहळ्यास मांजरसुंबा येथे आमदार सुरेश धस आणि धनंजय देशमुख यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.
या दिंडी सोहळ्यात सहभागी होत वारकरी परंपरेतील भक्तिभाव आणि विठ्ठलभक्तीचा अनुभव घेतला. या प्रसंगी धनंजय देशमुख यांच्यासह वारकरी, भक्त-भाविक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis