परळीत ‘लोककल्याणकारी सेवा पंधरवडा’चा शुभारंभ
बीड, 15 जुलै (हिं.स.) : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने आयोजित ‘लोककल्याणकारी सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा शुभारंभ आज नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ
अ


बीड, 15 जुलै (हिं.स.) : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने आयोजित ‘लोककल्याणकारी सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा शुभारंभ आज नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सेवा पंधरवड्याची सुरुवात विशेष स्वच्छता अभियानाने करण्यात आली. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने नगर परिषद मुख्यालय, उपजिल्हा रुग्णालय परिसर, न्यायालय परिसर, तहसील कार्यालय परिसर तसेच शहरातील विविध सार्वजनिक स्थळे, मोकळ्या जागा, कचरा साचणारी ठिकाणे, रस्त्यांच्या कडेला असलेले भाग आणि नागरिकांच्या दैनंदिन वापरातील परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी स्वच्छता ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश देण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करून परळी शहर अधिक स्वच्छ, निरोगी आणि सुंदर करण्याचा संकल्प करण्यात आला.

----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande